esakal | दिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या!
sakal

बोलून बातमी शोधा

ST_Bus

बसमध्ये उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी नसेल. तसेच मास्क असल्याशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. बसची फेरी पूर्ण होण्याआधी आणि पूर्ण झाल्यावर प्रत्येक बस सॅनिटाईज करण्यात येणार आहे.

दिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दीपावलीच्या सुट्यांनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शिवाजीनगर (वाकडेवाडी स्थानक), स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानकावरून 532 जादा बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.

हवेली तालुक्‍यात फटाके विक्रीचे परवाने मिळणार, पण...

नाशिक, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, धुळे, नंदूरबार जळगाव, चाळीसगाव, अकोला, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सांगली आदी विविध मार्गांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 ते 13 नोव्हेंबर या दिवशी जादा बस शहरातील तिन्ही स्थानकांवरून सुटतील. बसची पूर्ण क्षमता वापरून प्रवासी वाहतूक होणार असल्याचे महामंडळाच्या पुणे विभागाने स्पष्ट केले आहे.

बसमध्ये उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी नसेल. तसेच मास्क असल्याशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. बसची फेरी पूर्ण होण्याआधी आणि पूर्ण झाल्यावर प्रत्येक बस सॅनिटाईज करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या प्रवाशांनी प्रवास टाळावा, असे आवाहन महामंडळाचे पुणे विभागाचे वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्‍वर रणभरे यांनी दिली.

Pune ZP: स्थायी समितीवर आमले, जगदाळे बिनविरोध; अंकिता पाटील अर्थ समितीवर​

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून जादा बसचे आरक्षण करावे. तसेच एसटी बसच्या मोबाईल ऍपवरूनही प्रवाशांना जादा बसचे आरक्षण उपलब्ध होणार आहे. दीपावलीनिमित्त एसटी महामंडळाने कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. याची दखल घेवून प्रवाशांनी प्रवासासाठी एसटी बस वापरण्याचे आवाहन केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)