esakal | पुणेकरांनो, काळजी घ्याच! जिल्ह्यात ८०७५ नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Eight thousand seventy five corona patients found Pune district

पुणे जिल्ह्यातील साडेअठरा हजार कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल
आज ८०७५ नवे रुग्ण; शहरातील ४०७७ जण

पुणेकरांनो, काळजी घ्याच! जिल्ह्यात ८०७५ नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील १८ हजार ५६३ कोरोना रुग्णांना आजअखेरपर्यंत (ता.५) उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा ७७ हजार ८०८ वर पोचला आहे. आज दिवसभरात ८ हजार ७५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ४ हजार ७७ जण आहेत. अन्य ५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोवीस तासात ८ हजार ३०७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या दीड महिन्यांच्या कालखंडानंतर आज पहिल्यांदाच दिवसांतील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. दिवसातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३ हजार २४०, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८१५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ९१०, नगरपालिका हद्दीतील २९० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५२ रुग्ण आहेत.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार १५२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ३८६, नगरपालिका क्षेत्रात ३६७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९३ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३६ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील १५ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज नगरपालिका हद्दीत एकही मृत्यू झाला नाही.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!
 

एकूण सक्रिय रुग्णांपैकी ५९ हजार २४५ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार २६९, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ८०४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार ४१९, नगरपालिका हद्दीतील २ हजार ५०४, आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५६७ रुग्ण आहेत.

loading image