पुण्यात चारी धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा

पुण्यात चारी धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला : खडकवासला साखळीतील चार धरणात मिळून बुधवारी (ता.२३) अखेर आठ टीएमसी म्हणजे २७.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

चार ही धरणात बुधवारी(१६ जून) धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत गेली. याच दिवशी सकाळी सहा वाजता चार ही धरणात ६.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. या दिवशी चार ही धरणातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक होता. आज तो ८.०१ टीएमसी म्हणजे १.३९० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पानशेत वरसगावमध्ये अनुक्रमे ३९ व ५१ क्यूसेकने पाणी जमा होत आहे.

पुण्यात चारी धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा
रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे पोलिसाची आत्महत्या

मागील २४ तासात खडकवासला धरण येथे पाऊसच झालेला नाही. पानशेत येथे आठ, वरसगाव येथे सात तर टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता खडकवासला येथे ०, पानशेत १, वरसगाव २ व टेमघर २० मिलिमीटर पाऊस झाला होता. शनिवारपासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी होत गेला आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

मागील वर्षी पेक्षा जास्त पाणीसाठा

मागील वर्षी चार ही धरणात मिळून ५.८१ टीएमसी व १९.९३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. यंदा तो ८.०१ टीएमसी म्हणजे २७.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजे मागील वर्षी पेक्षा २.२ टीएमसी म्हणजे ७.५४ टक्के जास्त पाणीसाठा आहे.

पुण्यात चारी धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा
पुणे शहरात आज १९३ ठिकाणी लसीकरण; जाणून घ्या कुठल्या केंद्रावर कोणती लस

बुधवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

खडकवासला- 1.18 टीएमसी /59.59%

पानशेत- 3.78 टीएमसी /35.54%

वरसगाव- 2.54 टीएमसी /19.85%

टेमघर- 0.50 टीएमसी /13.53%

चार धरणात मिळून 8.01टीएमसी /27.47%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com