पक्ष प्रवेशावेळी खडसे-अजित पवारांमध्ये झाला संवाद पण असा...

khadse- pawar.jpeg
khadse- pawar.jpeg

पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 

आजच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे हजर राहता आले नाही, परंतु ते एकप्रकारे पक्ष प्रवेशाला हजरच होते. पक्ष नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत अजित पवार यांनी व्हिडिओ कॉल करत या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच खडसे यांना लाईव्ह शुभेच्छा देत त्यांचे पक्षात स्वागत केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून आरोग्य कारणास्तव आपल्या मुबंईतील घरात विश्रांती घेत आहेत. पण विश्रांती घेतील ते अजित पवार कसले. त्यांनी आपल्या शासकीय निवास 'देवगिरी' येथून कामाचा धडाका लावला आहे. तेथूनच ते आजच्या खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला देखील व्हिडिओद्वारे हजर होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणला. अजित पवार यांनी यावेळी लाईव्ह संवाद साधत खडसे व रोहिणी खडसे यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. तसेच अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत व्हीसीद्वारे सहभाग घेतला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कामकाजाचा आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या.

त्याचबरोबर अजित पवार यांनी एक पत्रक काढून देखील खडसे यांचे पक्षात स्वागत केले आहे. पत्रकांत म्हटल्याप्रमाणे, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, माननीय रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो. पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचे पत्रक काढून स्वागत केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पक्षप्रवेश झाला. खडसे यांनी बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी मुलगी जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे व हजारो कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी काळात उत्तर महराष्ट्रात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com