Eknath Khadse : भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना मोठा धक्का; दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने नाकारला!

Bhosari Land Scam : भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे.पदाचा दुरुपयोग व कटकारस्थानाचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे कोर्टाने नमूद केले.
The special court rejects Eknath Khadse’s discharge plea in the Bhosari land scam

The special court rejects Eknath Khadse’s discharge plea in the Bhosari land scam

Sakal

Updated on

पुणे : भोसरीमधील एमआयडीसीच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी तत्कालीन महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी व जावयाने केलेला अर्ज मुंबई येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळला आहे. खडसे हे महसूल मंत्री असताना यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com