Pune News : एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर

खडसे हे महसूल मंत्री असताना यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता.
Eknath Khadse
Eknath Khadse esakal

पुणे - भोसरीतील एमआयडीसीमधील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तिघांनाही अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी गुरुवारी (ता. २१) जामीन मंजूर केला.

खडसे हे महसूल मंत्री असताना यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास केल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिघांनी या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला. मात्र विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com