Lonavala News: आधी सुविधा द्या, मगच रोपवे!’ एकवीरा देवी मंदिर परिसरातील मागण्यांसाठी ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

Lonavala Villagers Protest Ekvira Devi Ropeway Project: एकवीरा देवी मंदिर परिसरातील रोपवे प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आधी पाणी, स्वच्छतागृहे, वाहतूक, पार्किंग व सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांची मागणी
Ekvira Devi Temple Ropeway Protest Villagers In Lonavala Hold Road Blockade Over Basic Facilities And Local Rights

Ekvira Devi Temple Ropeway Protest Villagers In Lonavala Hold Road Blockade Over Basic Facilities And Local Rights

sakal

Updated on

लोणावळा : श्री क्षेत्र एकवीरा देवी देवस्थान परिसरातील प्रलंबित मूलभूत सुविधा आणि स्थानिकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेहरगाव व दहिवली ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केले. ‘आधी मूलभूत सुविधा द्या, त्यानंतरच रोपवेचा विचार करा’ अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी मंदिराच्या पायथ्यापासून मुंबई-पुणे महामार्गापर्यंत मोर्चा काढत काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com