एकवीरा मंदिराजवळ दरड कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

लोणावळा - कोळी, आगरी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील एकवीरा देवी गडानजीक सोमवारी (ता. 21) सायंकाळी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. 

लोणावळा - कोळी, आगरी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील एकवीरा देवी गडानजीक सोमवारी (ता. 21) सायंकाळी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. 

देवीचे दर्शन घेऊन बाहेर येण्याच्या मार्गावर देवस्थानच्या खोलीलगत लोखंडी जाळीचे आच्छादन बसविण्यात आले आहे. या आच्छादनावर ही दरड कोसळली. सुदैवाने या ठिकाणी भाविकांची व पुजाऱ्यांची वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षी याच ठिकाणी दरडींसह गडावरील भराव कोसळला होता. परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरडींचा धोका कायम आहे. एकवीरा देवीच्या गडावर तसेच पायरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने दरडी पडणे, भराव खचणे, दगडे-गोटे पडणे, संरक्षक भिंतीचा भराव खचण्याच्या घटना घडत आहे. पुरातत्त्व विभाग व वनखात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. दरडींवर संरक्षक जाळ्या लावण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली; मात्र अद्याप कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. भविष्यात अधिक हानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Ekvira Temple Lonavala

टॅग्स