

Pacific Ocean El Nino conditions intensify as a potential cyclone develops over the Bay of Bengal.
esakal
पुणे : प्रशांत महासागरातील एल निनो सध्या सर्वोच्च पातळीजवळ पोहोचत असून, डिसेंबरमध्ये तेथील तापमान सरासरीपेक्षा ३.०७ अंश सेल्सिअस अधिक नोंदले जाऊ शकते, असा अंदाज अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) जाहीर केला आहे. फेब्रुवारीपासून प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्यावर दोन अंशांपर्यंत येण्याचा अंदाज असून, पुढील वर्षी जूनमध्ये न्यूट्रल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आता ७५ टक्के झाली आहे, असे ‘सीपीसी’च्या अंदाजात म्हटले आहे.