Lok Sabha Poll 2024 : मतदानासाठी बारा ओळखीचे पुरावे ग्राह्य

मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रजवळ नसल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अन्य १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.
Election Commission approve other Twelve valid identity proofs for voting know which are this
Election Commission approve other Twelve valid identity proofs for voting know which are this Sakal

Pune News : मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रजवळ नसल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अन्य १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. ७) बारामतीमध्ये, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित केलेले पासबुक,

पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीअंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्टकार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित केलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचा दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधारकार्ड,

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्टकार्ड, असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com