उरुळी कांचन - कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदार केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे..मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणारे तीन मतदार सतर्क नागरिकांच्या सहाय्याने भरारी पथकाने रंगेहाथ पकडले, तर तीन संशयित मतदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिक व सजग मतदारांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली..चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे सादर केलेली ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे उघड झाले. तत्काळ कारवाई करत निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन बोगस मतदारांना ताब्यात घेतले.मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन जण घटनास्थळावरून पसार झाले..या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पकडलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे..लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जनतेमधून होत आहे. या मतदान केंद्राच्या केंद्र प्रमुखाने रीतसर तक्रार दिल्यानंतर या बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.