निवडणूक अधिकाऱ्यांची 11 कार्यालये निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पिंपरी - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये निश्‍चित झाली आहेत. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी काही कार्यालयांची पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह-शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

पिंपरी - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये निश्‍चित झाली आहेत. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी काही कार्यालयांची पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह-शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी निश्‍चित केलेल्या कार्यालयांच्या ठिकाणी स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत विभागांसह विविध सोयी-सुविधा देण्याच्या सूचना आयुक्त वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

साई शारदा महिला आयटीआय (कासारवाडी), पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान (सांगवी), संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल (इंद्रायणीनगर), स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल (कृष्णानगर, चिखली), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या.

हरकती नोंदविण्यास सुरवात
प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांकडून हरकती नोंदविण्यास सुरवात झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या हरकतींबाबत आवश्‍यक कार्यवाही केली जाईल. प्रारूप मतदार यादीची मुद्रित प्रत आणि डीव्हीडी स्वरूपातील सॉफ्ट कॉपी विक्रीसाठी असल्याने इच्छुक उमेदवार ते घेऊन जात आहेत. शंभरपेक्षा अधिक डीव्हीडी स्वरूपातील मतदार याद्यांची विक्री झाली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने (निवडणूक) यांनी दिली.

'निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये निश्‍चित केली आहेत. तसेच, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती केली आहे.''
- दिनेश वाघमारे, आयुक्त.

'नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. राज्य निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेत राजकीय पक्षांनी सहभाग घ्यावा. तसेच, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवकांना मत द्यायचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकशाहीच्या बळकटीसाठी चांगले उमेदवार द्यावेत.''
- डॉ. यशवंत माने, सहायक आयुक्त (निवडणूक).

महत्त्वाचा टेबल...
प्रभाग निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय

1) 1, 11, 2 स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, स्पाइन रस्ता, कृष्णानगर, चिखली.
2) 3, 6, 8 संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर-भोसरी.
3) 4, 5, 7 अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी.
4) 9, 10, 20 "क' प्रभाग कार्यालय, एमआयडीसी, भोसरी.
5) 12, 13, 14 अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, प्राधिकरण, पेठ क्रमांक 26, निगडी.
6) 15, 16, 17 हेडगेवार भवन, पेठ क्रमांक 26, प्राधिकरण.
7) 18, 19, 21 "ब' प्रभाग कार्यालय, पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, चिंचवड.
8) 22, 23, 27 नवीन महापालिका शाळा इमारत, थेरगाव करसंकलन कार्यालयाशेजारी, थेरगाव.
9) 24, 25, 26 "ड' प्रभाग कार्यालय, रहाटणी.
10) 28, 29, 30 साई शारदा महिला आयटीआय, कासारवाडी.
11) 31, 32 पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी.

Web Title: election officer offices final