esakal | पुण्याच्या महापौरपदासाठी उद्या निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या महापौरपदासाठी उद्या निवडणूक

महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असल्याने या पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड निश्‍चित आहे.

पुण्याच्या महापौरपदासाठी उद्या निवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदांसाठी शुक्रवारी (ता.22) निवडणूक होणार असून, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असल्याने या पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड निश्‍चित आहे. दुसरीकडे, विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार ? याची उत्सुकता आहे. 

महापौर मुक्ता टिळक यांची मुदत गुरुवारी (ता.21) संपल्याने या महापौर आणि उपमहापौरपदांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने मोहोळ आणि शेंडगे यांना संधी दिली आहे. आघाडीतर्फे महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसच्या चांदबी नदाफ उमेदवार आहेत. तर, या पदांसाठी अर्ज भरताना शिवसेना आणि मनसे तटस्थ राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी अकरा वाजता ही निडणूक होणार आहे.

भाजपकडील बहुमताचा आकडा पाहता मोहोळ आणि शेंडगे यांच्या नावांच्या घोषणेची औपचारिकता आहे.

loading image