Vidhan Sabha 2019 : चहा चार तर, पोहे दहा रुपये

Tea-Poha
Tea-Poha

विधानसभा 2019 
पुणे - निवडणूक म्हटले की कार्यकर्त्यांची चंगळ... बिर्याणी अन्‌ बरंच काही... पण निवडणूक आयोगाने ‘रेट कार्ड’द्वारे त्यावरही अंकुश आणला असून, चहासाठी ४ रुपये, तर पोहे-उपीटसाठी प्रत्येकी १० रुपयेच खर्च करावा, असे बजाविले आहे. शाकाहारी भोजनासाठी ७०, तर सामिष भोजनासाठी १४० रुपयांची मर्यादा घातली आहे. गाड्यांच्या ड्रायव्हरलाही प्रती दिन ५०० रुपये देण्यास बजाविले असून, त्यापेक्षा अधिकचे दर निवडणूक खर्चात चालणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी रेट कार्ड नुकतेच प्रसिद्ध केले आहे. एका उमेदवाराला २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांना प्रचारासाठी होणारा खर्च जिल्हा निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. खर्च करताना त्याचे दर काय असावेत, 

हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून, त्यानुसार उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर करावा, असे नमूद केले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (ता. ५) होणार आहे. सोमवारी (ता. ७) अर्ज मागे घेण्याची मुदत असेल, तर त्याच दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप  होणार आहे. 

१८० वस्तूंचे दर निश्‍चित
‘रेट कार्ड’मध्ये निवडणूक आयोगाने १८० वस्तूंचे दर निश्‍चित केले आहेत. फेटे, टोप्या, शाल यांची अनुक्रमे दीडशे, १५ रुपये आणि १०० रुपये किंमत निश्‍चित केली आहे. टीव्हीसाठी ५०० रुपये प्रती दिन भाडे आहे. स्टेशनरी, बॅनर, पोस्टर्स यांचेही दर ठरविले आहेत. वाहनांचे २१ प्रकार निश्‍चित केले असून, त्यानुसारच आयोगाने दर ठरविला आहे. 

‘रेट कार्ड’नुसारच उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर करायचा आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारताना त्यांना या बाबत माहिती देण्यात आली आहे.
- नीता शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी, कॅंटोन्मेंट मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com