आगाखान पॅलेसवरील विद्युत रोषणाई काढली

आगाखान पॅलेसवरील विद्युत रोषणाई काढली

येरवडा - भारतीय पुरातत्त्व विभागाने आगाखान पॅलेसच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये खर्च केले असून, कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मात्र विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांना या दिव्यांची रंगसंगती न आवडल्याने ते काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आगाखान पॅलेस हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची वास्तू आहे. दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी येत असतात. सहा वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने या पॅलेसला 

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन ते ताब्यात घेतले आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम, अहमदाबाद येथील साबरमती आश्रमासह येरवड्यातील आगाखान पॅलेसचे सुशोभीकरण करून कायम स्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांनी या पॅलेसवरील रोषणाईची पाहणी केली. त्यांना दिव्यांची रंगसंगती न आवडल्याने ते काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पॅलेसवरील रोषणाई अल्पावधीची ठरली. त्यामुळे दिवे बसविण्यासाठी केलेले खड्डे, फिटिंग, वायरिंग आदींचा खर्च वाया गेला आहे. पॅलेसच्या परिसरात पदपथावरील दिवे बंद असल्याची तक्रारदेखील पर्यटकांनी केली आहे.  

केंद्र सरकारने आगाखान पॅलेसची सुशोभीकरण  करून कायमस्वरूपी आकर्षण विद्युत रोषणाई  केली होती. मात्र नव्याने बसविलेले सर्व दिवे आता काढण्यात आले आहेत. दिवे कोणत्या रंगात असावे यासाठी दिल्लीवरून परवानगी मिळाल्यानंतर ते परत बसविण्यात येणार आहेत. 
- गजानन मांडावले, सहायक संरक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com