वीज मीटर मिळता मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे - ‘वीजमीटर उपलब्ध आहेत’, ‘मीटर उपलब्ध आहेत की नाही, हे ऑनलाइन कळणार,’... अशा घोषणा महावितरणकडून करण्यात येत होत्या. मात्र एका वयोवृद्ध महिलेला महिन्याहून अधिक काळ होऊनही नादुरुस्त मीटर बदलून मिळत नसल्याने महावितरणच्या या घोषणा पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संबंधित महिलेला ‘मीटर जळाला, तरी मीटर देऊ शकत नाही. कारण मीटर उपलब्ध नाहीत,’ असे उत्तर महावितरणकडून दिले जात आहे. अशा प्रकारे पैसे भरलेत; परंतु मीटर अद्याप मिळाला नाही, अशा ग्राहकांची यादी मोठी असल्याचे समजते.

गुजराथ कॉलनी येथील ७२ वर्षीय डॉ. शैला काळकर यांचा हा अनुभव आहे. वीजबिल जास्त येत असल्यामुळे त्यांनी महावितरणकडे तक्रार दिली होती. त्यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येऊन मीटरची तपासणी केली.

त्यामध्ये मीटर नादुरुस्त असल्याचे दिसून आले. तो बदलून देण्यासाठी त्यांना अर्ज करा, असे सांगण्यात आले. त्यांनी अर्ज करून एक महिना उलटूनही त्यांना अद्याप मीटर मिळालेला नाही. या संदर्भात त्यांनी महावितरणशी अनेकदा संपर्क साधला, त्या वेळी ‘तुम्ही फोन करत राहा, मीटर आले की कळवू. सध्या मीटर उपलब्ध नाहीत,’ असे उत्तर त्यांना दिले जात आहे. डॉ. काळकर यांच्यासारखाच अनुभव अनेक ग्राहकांचा आहे. त्यामुळे मीटर उपलब्ध असल्याचा महावितरणकडून करण्यात असलेला दावा फोल ठरला आहे.

अधिकाऱ्याकडून तुटवड्याची कबुली
मीटरचा तुटवडा असल्याची कबुली महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मात्र लवकरच मीटर उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Electric Meter