

Pune Electrician Dies After Chased By Dog
ESakal
पुण्यातील कसबा पेठेत एक दुःखद घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ४५ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना मृत्यू झाला आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात असे दिसून आले आहे की, कुत्रा योग्य नियंत्रणात नव्हता.