Manchar News : भीमाशंकर व आदिवासी भागाचा वीज प्रश्न सुटणार! डिंभे येथे ३३/११ केव्हीचे नवीन वीज उपकेंद्र उभारणार; विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

डिंभे, भीमाशंकर आणि पश्चिम आदिवासी भागातील कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार.
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

sakal

Updated on: 

मंचर - डिंभे, भीमाशंकर आणि पश्चिम आदिवासी भागातील कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत या प्रकल्पासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीडीसी) तीन कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...