सहकारनगरच्या ट्रेझर पार्क सोसायटीत गेले चाळीस तास अंधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

गुरुवारी रात्री बारा वाजता विद्युतपुरवठा खंडित झाल्याने दोन दिवसांपासून सोसायटीत विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पाणी व लिफ्ट इ. सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महिला, लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. पूरपरिस्थितीमध्ये ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांना आर्थिक नुकसानी बरोबर मानसिकदृष्ट्याही सामना करावा लागत आहे. सोसायटीतील रहिवाशी मनपा प्रशासन व विद्युतवितरण विभाग प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

सहकारनगर : ट्रेझर पार्क सोसायटीत मागील चाळीस तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूरपरिस्थितीमुळे वीज, पाणी लिफ्ट अशा अनेक गोष्टीशी रहिवाशांना सामना करावा लागत असल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्यांच्याकडून महावितरण संदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे ट्रेझर पार्क सोसायटीमधील सुरक्षा भिंत पडून ट्रेझर पार्क सोसायटीमधील पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने हजारो गाड्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्याच बरोबर पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने मीटर रूममधील विद्युतमीटर खराब झाल्याने पंधरा दिवस ट्रेझर पार्क सोसायटीतील रहिवाशांना अंधारात बसावे लागले.

गुरुवारी रात्री बारा वाजता विद्युतपुरवठा खंडित झाल्याने दोन दिवसांपासून सोसायटीत विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पाणी व लिफ्ट इ. सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महिला, लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. पूरपरिस्थितीमध्ये ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांना आर्थिक नुकसानी बरोबर मानसिकदृष्ट्याही सामना करावा लागत आहे. सोसायटीतील रहिवाशी मनपा प्रशासन व विद्युतवितरण विभाग प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

''ट्रेझर पार्क सोसायटीतील गुरुवारी रात्री बारा खंडित झालेला विद्युतपुरवठा  शनिवारी चार वाजेपर्यंत सुरू झालेला नाही. पाणी, लिफ्ट नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.''
- सदानंद आंब्रे, ट्रेझर पार्क रहिवासी

''ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांना पूरपरिस्थिती गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले तर, यापूर्वी पंधरा दिवस विद्युतपुरवठा नव्हता त्यामुळे ही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गेले दोन दिवसापासून सोसायटीत विद्युतपुरवठा नाही अशा वारंवार विद्युतपुरवठा संदर्भात घटना घडत आहेत. रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महागाचे प्लँट घेऊन सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- ज्योतिबा उबाळे, रहिवाशी

''विद्युत लाईन केबल टेस्टिंग ट्रेसद्वारे पाहणी केली असता, फॉल्ट सापडत नसल्याने आता सातारा रस्ता येथील डी मार्ट शेजारी विद्युतलाईन येथे खोदाई करून विद्युतलाईन जोडण्याचे काम सुरू असून लवकरच विद्युतपुरवठा सुरू होईल''
अंजली मोने, कनिष्ठ अभियंता विद्युत वितरण विभाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Cut from last Forty hours at the Treasure Park Society of Sahakar Nagar