वारजे माळवाडी परिसरात सतत वीज पुरवठा खंडीत

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 30 जून 2018

कृती समितीचे पदाधिकारी व नगरसेवक दिलीप बराटे यांनी सांगितले की, वारजे परीसरामध्ये महावितरण कंपनीकडून गेले अनेक दिवस लाईट मिटर धारकांना फार मोठया प्रमाणावर लाईट बिल येत आहे. त्यामुळे, ग्राहकांना विनाकारण आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. तसेच, परीसरातील वीज पुरवठा वारवार खंडीत होत आहे.
वाढीव बील व वीज पुरवठा खंडीत होण्याबाबत शिवणे वारजे येथील कार्यालयाकडे चौकशी केली असता उडवाउडवी उत्तरे दिली जातात. 

वारजे माळवाडी : परीसरातील वाढीव वीज बील येत असून त्याचबरोबर वीज पुरवठा देखील वारंवार खंडीत होण्याची समस्या वाढली आहे. यामुळे, नागरिक त्रस्त  झाले आहेत. म्हणून महावितरणच्या विरोधात वारजे विकास कृती समिती धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा दिला आहे. याबाबत, कृती समितीच्या वतीने महावितरणला पत्र देण्यात आले. 

कृती समितीचे पदाधिकारी व नगरसेवक दिलीप बराटे यांनी सांगितले की, वारजे परीसरामध्ये महावितरण कंपनीकडून गेले अनेक दिवस लाईट मिटर धारकांना फार मोठया प्रमाणावर लाईट बिल येत आहे. त्यामुळे, ग्राहकांना विनाकारण आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. तसेच, परीसरातील वीज पुरवठा वारवार खंडीत होत आहे.
वाढीव बील व वीज पुरवठा खंडीत होण्याबाबत शिवणे वारजे येथील कार्यालयाकडे चौकशी केली असता उडवाउडवी उत्तरे दिली जातात. 

या वाढीव बीले आणि चार परीसरातील सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठ्याच्या बाबत आठ दिवसात निर्णय द्यावा. अन्यथा सोमवार दिनांक ०२ जुलै २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 

Web Title: electricity problem in Warje Malwadi Pune