स्मार्ट सिटीतील नागरिक म्हणताहेत गड्या आपला गाव बरा!

जुनी सांगवीसह उपनगरातील पिंपळे निलख, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी भागातील विजेच्या लंपडावामुळे नागरिक वैतागले आहेत.
स्मार्ट सिटीतील नागरिक म्हणताहेत गड्या आपला गाव बरा!
Summary

जुनी सांगवीसह उपनगरातील पिंपळे निलख, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी भागातील विजेच्या लंपडावामुळे नागरिक वैतागले आहेत.

जुनी सांगवी - जुनी सांगवीसह उपनगरातील पिंपळे निलख, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी भागातील विजेच्या लंपडावामुळे नागरिक वैतागले आहेत. सुरु असलेला पाऊस कुठे शॉर्ट सर्किट तर कुठं केबल जळणे, ट्रीप होणे या प्रकारामुळे परिसरातील विज पुरवठा तासनतास खंडीत होत असल्यामुळे चाकरमानी मंडळी, गृहीणी, शाळकरी मुले, उद्योजक, व्यापारी, आयटी विभागाताली वर्क फ्रॉम होम मध्ये काम करणा-या मंडळींना त्रास सहन करावा लागत आहे. विज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठा ही विस्कळीत होत असल्याने स्मार्ट पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट उपनगरातील नागरिक जाम वैतागले आहेत. विजेच्या सततच्या लंपडावामुळे गड्या आपला गाव बरा, स्मार्ट सिटीत लाईट स्मार्ट कधी होणार? असा सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्न विचारला जात आहे. विज खंडीत झाल्यास महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एका भागातील विज सुरळीत करत असताना दुसरीकडे विज पुरवठा खंडित झालेला असतो.यामुळे पडणा-या पावसात महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांना जिव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे.

काय आहेत कारणे -

जुन्या झालेल्या केबल, शहरातील रस्ते विकास कामात तुटलेल्या मार बसलेल्या केबल.

स्मार्ट रस्ते करताना महावितरणला न विचारता ठेकेदारांनी केलेली खोदकामे .

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सिमेंट कॉंक्रीटीकरण करताना गाडल्या गेलेल्या केबल यामुळे दुरूस्ती करण्यासाठी पुन्हा खोदकामाची परवानगी महावितरणला पालिका प्रशासनाकडून घ्यावी लागते आहे. यात विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. सिमेंट रस्ते करताना विजपुरवठा करणा-या विद्यूत केबलच्या भविष्यातील दुरूस्तीचा विचार केला नाही. स्मार्ट रस्ते खोदकाम करताना जुन्या तुटलेल्या केबल आज विजपुरवठा खंडीत होण्यास कारणीभूत ठरत आहेत. नविन केबलची मागणी असतानाही पुर्तता होत नसल्याने नागरिकांना खंडीत विजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्मार्ट सिटी रस्ते विकास व खोदकामात झालेल्या चुकांमुळे नागरिकांना विजेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कामे करताना विद्यूत पुरवठा दुरुस्ती देखभाल,पावसाळी पाण्याचा निचरा होणे या गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

- प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक जुनी सांगवी.

लाईट जाण्याच्या समस्येमुळे घरातील कामे खोळंबतात. काम,मुलांची शाळा विस्कळीत होत आहे.

- रंजना शिंदे, नागरिक मुळानगर

याबाबत नविन केबल मिळणे, सिमेंट रस्त्याखाली गाडल्या गेलेल्या केबल बाजूला करणे यासाठी पिंपरी महावितरण वरिष्ठ अधिकारी व कार्यालयाकडून माननीय पालिका आयुक्त व महावितरण पुणे मुख्य कार्यालयाकडे शहर व परिसरात असलेली नविन केबलची मागणी व त्यासंबंधीत कामासाठी लागणारी आवश्यकता याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.

- आर. एम. काळे, अभियंता सांगवी विभाग महावितरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com