मावळात महावितरणाच्या तत्परतेने वीज पुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील फळणे जवळ दोन वीजवाहक खांब पडून परिसरातील वीज पुरवठा बंद झाला होता. परंतू, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता भर पावसात महावितरणने वीजेचे दोन्ही खांब उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला. सहाय्यक अभियंता, शाम दिवटे, उपकार्यकरी अभियंता विजय जाधव, कार्यकारी अभियंता गोरडे या अधिकाऱ्यांनी तत्परतेने हे काम हाती घेतले. पुणे ग्रामीण मंडळ अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी यासाठी मार्गदर्शन केले.

आंदर मावळाच्या पश्चिम भागाला जोडणारी ही वीजवाहक यंत्रणा चाळीस वर्षापूर्वी उभी केली आहे. वा-याच्या हेलकाव्याने ती कोलमडून पडली हे खरे आहे. पण चाळीस वर्षापूर्वी लोखंडी खांब टाकून त्यावर वीजवाहक तारा ओढल्या आहे. या लोखंडी खांबाला गंज आला आहे, खांबाच्या पायथ्याला अनेक छिद्र पडली आहे. या दोन्ही खांबाला मोठे छिद्र पडली त्यात वाऱ्याने हेलकावे दिल्याने खांब पडले.

ऐन कामाच्या दिवसात वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त होते. परंतु, महावितरणने हे काम तातडीने हाती घेतल्याने स्थानिकांनी महावितरणला धन्यवाद दिले.

Web Title: electricity supply is normal in Maval