MP Supriya Sule : ‘इलेक्ट्रॉल बॉन्ड्सबाबत, व्हाईट पेपर काढायला हवा’

इलेक्ट्रॉल बॉन्ड्सबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्याबाबतची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने समोर आणली. याबाबत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
MP supriya sule
MP supriya sule sakal

खडकवासला - इलेक्ट्रॉल बॉन्ड्सबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्याबाबतची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने समोर आणली. याबाबत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असे अनेक वर्तमानपत्रात चॅनेलवर सोशल मीडियावर फिरत आहे. म्हणून आता केंद्र सरकारने व्हाईट पेपर काढायला हवा. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना मागणी केली. खासदार सुळे यांचा आज रविवारी खडकवासला परिसरात दौरा सुरू होता.

आज देशासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचे आहे. या बॉण्डमध्ये नक्की काय झाले, भ्रष्टाचार झाला असेल तर, देशाला उत्तर मिळाले पाहिजे. असे सांगून त्या म्हणाल्या, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स मध्ये नक्की काय झाले, ते कोणी विकत घेतले, त्या कोणत्या कंपनीला कोणता ठेका मिळाला, तो बॉण्ड कोणत्या पक्षाला मिळाला, इन्फास्ट्रक्चर मधील प्रोजेक्ट, गॅम्बलरिंग ची नावे आहेत.

इडी आणि सीबीआयचे छापे त्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स विकत घेतले. जुगार खेळणारे कंपन्यांनी देखील बॉण्ड हजारो कोटी रुपयांचे विकत घेतले आहेत. त्यामुळे यायाब्त शेतपत्रिकेच्या काढावी. त्या माध्यमातून यातील खरी माहिती उघड होईल.

सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कालच रिलीफ मिळाला. मात्र पुन्हा एकदा त्यांना समन्स बजाविले आहेत. सध्याचे सुडाचे राजकारण सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सगळ्यात मोठे आव्हान पाणी आहे. नाजरे धरणात पाणी नाही, उजनीमध्ये पाणी कमी आहे. शेतकरी अडचणीत आला आहे.

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याच्या मंडपावर पाच कोटी रुपये खर्च केला. येथे ४३ हजार नोकऱ्या मिळणार होत्या. पण १० हजार नोकऱ्या मिळाल्या. मग ३३ हजार नोकऱ्या कुठे गेल्या. काँग्रेस नसती तर यांच्या आयुष्यात काय झालं असतं वसंत मोरे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागतच राजकारण माझ्यासाठी व्यवसाय नाही. फायदा किंवा तोट्यासाठी मी राजकारण करत नाही. त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पैसा वापरला. तो पैसा शाळा, हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरला गेला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com