आमदार गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

चाकण - येथील पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी (ता. २६) रात्री तीन चाकी पॅगो रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार सुरेश गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. 

चाकण - येथील पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी (ता. २६) रात्री तीन चाकी पॅगो रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार सुरेश गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. 

चाकणला वाहतूक कोंडी सातत्याने होते आहे. या वाहतूक कोंडीला तीन चाकी पॅगो रिक्षांची अवैध वाहतूक जबाबदार आहे. ही अवैध वाहतूक पोलिसांनी बंद करावी, अशी मागणी आमदार गोरे यांनी पोलिसांकडे केली होती. तसेच, अवैध वाहतूक बंद करावी, असा ठरावही नगर परिषदेने केला होता. मात्र, पोलिस अवैध वाहतुकीवर काहीच कारवाई करत नव्हते. त्यामुळे आमदार गोरे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान तळेगाव चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या तीन चाकी पॅगो रिक्षांची तोडफोड केली. रिक्षाच्या काचा, दिवे यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचालक व इतर नागरिकांत घबराट झाली होती. रिक्षाचालकांची पळापळ झाली होती. आमदार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. याबाबत रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे. आमदार गोरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, नगरसेवक प्रवीण गोरे, लक्ष्मण जाधव, राहुल गोरे व इतरांवर रिक्षांची तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Eleven people including MLA Suresh Gore have a crime report