वय फक्त 11; अन् आजारपणाला कंटाळून तिने उचललं मोठं पाऊल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

गौरी हिला किडनीचा त्रास होता. आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करावे लागायचे. या आजारपणाला कंटाळून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून गौरी हिने उडी घेतली.

अकरावर्षीय मुलीची इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या  

पिंपरी : अकरावर्षीय मुलीने इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.13) पिंपळे गुरव येथे घडली. आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
  
गौरी प्रकाश राऊत (वय 11, रा. फ्लॅट क्रमांक सहा, दुर्वांकुर बिल्डिंग, गल्ली क्रमांक पाच, सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. गौरी हिला किडनीचा त्रास होता. आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करावे लागायचे. या आजारपणाला कंटाळून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून गौरी हिने उडी घेतली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला.

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

गौरीचे इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. यापुढेही तिला शिकायचे होते. मात्र, प्रकृती ठिक नसल्याने शाळेत जाणे शक्‍य होत नव्हते. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven year old girl commits suicide by jumping from a building due to tired of illness in Pimple gurav

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: