तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

एका तरुणीने ट्विटर अकांऊटवर पुणे पोलिसांना टॅग करुन धानोरी पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक मागितला. त्यावर तत्परतेने उत्तर देत पोलिसांना धानोरी पोलिस चौकीचा संपर्क क्रमांक पोलिसांनी दिला. पण, एका तरुणाला या तरुणीमध्ये भलताच इंट्रेस्ट निर्माण झाला आणि ट्विटरवर @abhirchiklu या नावाने  काऊंट असलेल्या या महाशयांनी पुणे पोलिसांना टॅग करत मला या मुलीचा नंबर मिळेल का? प्लिज  असे ट्विट केले.

पुणे : पुणे पोलिसांची पुणेरी शैली सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. गेल्या काही दिवासांपासून पुणे पोलिसांची मज्जेशीर उत्तर देण्याची शैली ट्विटरवर चांगलीच गाजली आहे. आता पुन्हा एका महाभागाने ट्विटरवर पोलिसांनाच एका मुलीचा नंबर मागितला आहे. त्यावर पुणे पोलिसांनी दिलेले उत्तर नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहे.

अभ्यासानंतरच ‘बीआरटी’ धावणार!

सध्या सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. पोलिसही सोशल मिडियाच्या माध्यामातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिक देखील स्वत: सोशल मिडियाच्या माध्यामतून पोलिसांना मदत मागतात. अशीच मदत एका तरुणीने पुणे पोलिसांना मागितली.

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

एका तरुणीने ट्विटर अकांऊटवर पुणे पोलिसांना टॅग करुन धानोरी पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक मागितला. त्यावर तत्परतेने उत्तर देत पोलिसांना धानोरी पोलिस चौकीचा संपर्क क्रमांक पोलिसांनी दिला. पण, एका तरुणाला या तरुणीमध्ये भलताच इंट्रेस्ट निर्माण झाला आणि ट्विटरवर @abhirchiklu या नावाने  काऊंट असलेल्या या महाशयांनी पुणे पोलिसांना टॅग करत मला या मुलीचा नंबर मिळेल का? प्लिज  असे ट्विट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरुणाच्या या अजब मागणीला मज्जेशीर उत्तर देत पुणे पोलिस म्हणाले, ''सर, सध्या आम्हाला तुमचा मोबाईल नंबर जाणुन घेण्यात जास्त इंट्रेस्ट आहे. आम्हाला जाणून घ्यायचे  आहे की, या तरुणीचा नंबर तुम्हाला का हवा आहे. तुम्ही आम्हाला थेट मेसज करु शकता. आम्ही तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतो. तरुणाच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी टिका केली तर, पुणे पोलिसांचे उत्तर व्हायरल केले. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police Give funny reply to Boy demanding mobile number of girl on twitter

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: