चौथ्या फेरीतही कट ऑफमध्ये वाढच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयातील कट ऑफ नव्वदीतच असल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही महाविद्यालयांमध्ये पहिल्या, दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या, चौथ्या फेरीत कट ऑफ कमी होण्याऐवजी एक ते दोन टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

आता वाढता वाढे ‘कट ऑफ’ असे म्हणायची वेळ आली असून, पसंतीच्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळणार का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना सतावू लागला आहे. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय यांसह अन्य नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ चौथ्या फेरीतही ९० टक्‍क्‍यांवरच आहे.

साधारणपणे दुसऱ्या, तिसऱ्या फेरीमध्ये गुणांचा कट ऑफ उतरत्या क्रमाने असतो, असा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. परंतु मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतही काही महाविद्यालयांचा कट ऑफ वाढत असल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळावे, म्हणून प्रत्येक फेरीनंतर महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल करण्याची सुविधा असल्यामुळे प्रत्येक फेरीनंतर जाहीर झालेल्या कट ऑफमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला.

Web Title: Eleventh Admission Cut Off Education