अकरावी प्रवेशाची उद्यापासून अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणारास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अंतिम फेरी होणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले, प्रवेश नाकारलेले, तसेच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

पुणे - अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणारास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अंतिम फेरी होणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले, प्रवेश नाकारलेले, तसेच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

अंतिम फेरीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटात ३५ ते शंभर टक्के गुण मिळविलेले, तर दुसऱ्या गटात दहावीच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेले आणि पहिल्या गटातील उर्वरित विद्यार्थी असतील. ज्या विद्यार्थ्यांना आधी प्रवेश मिळाला आहे, त्यांना तो रद्द करायचा असेल, तर त्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितले.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील ही अंतिम फेरी आहे. या फेरीत मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. त्यानंतर कोणतीही फेरी आयोजित करण्यात येणार नाही. याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Admission Final Round Education