11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळ ठप्प; ‘ट्रॅफिक जाम’मुळे विद्यार्थ्यांची तारांबळ, प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

ऑनलाइन पोर्टल ठप्प, अर्ज भरणे व कागदपत्रे अपलोड करताना विद्यार्थ्यांची मोठी अडचण; तांत्रिक त्रुटींमुळे राज्यभरातील पालक-विद्यार्थी चिंतेत
Technical Glitch: Server Overload Disrupts Class 11 Online Admission Process

Technical Glitch: Server Overload Disrupts Class 11 Online Admission Process

sakal

Updated on

पुणे : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविताना शुक्रवारी संकेतस्थळावर ‘ट्रॉफिक जाम’ झाल्याने पुन्हा एकदा ते ठप्प झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, संकेतस्थळातील तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता या फेरीसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता. २५) नोंदणी आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहे. तर पहिल्या फेरीची निवड यादी येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com