अकरावीच्या ऑनलाइन वर्गाला लागला ब्रेक

अकरावीच्या ऑनलाइन वर्गाला लागला ब्रेक

पुणे : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत पसंतीच्या महाविद्यालयात नाव लागल्याने लगेचच प्रवेश घेतला. प्रवेशानंतर काही दिवसांत महाविद्यालय (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) सुरू होईल, असे वाटले होते. मात्र प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवले गेले. मात्र त्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला शिक्षण विभागाने अकरावीसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केल्याने पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून घरी असलेल्या आम्हाला (अकरावीचे विद्यार्थी) काहीसा दिलासा मिळाला. पण हे ऑनलाईन वर्गही अचानक बंद झाल्याने 'आता काय करायचे?', असा प्रश्न पडला आहे," असे कला शाखेत प्रवेश घेतलेल्या तन्वी कदम हिने सांगितले.

कोरोनाच्या धास्तीने घराबाहेर फारसे पडता येत नाहीये, काहींचा प्रवेश झाला पण अभ्यासाचे काय?, तर अनेकाजण अजूनही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या परिस्थितीमुळे अकरावीचे विद्यार्थी आधीच हताश आणि काहीसे निराश झाले आहेत. त्यात आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले अकरावीचे ऑनलाइन वर्ग बंद झाल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अकरावीची स्थगित झालेली प्रवेश प्रक्रिया आणि पहिल्या यादीत प्रवेश घेऊनही अद्याप कनिष्ठ महाविद्यालय सुरू न झाल्यामुळे हताश झालेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एससीईआरटीच्या यु-ट्यूब चॅनलवर दोन नोव्हेंबरपासून अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. दररोज तीन तास याप्रमाणे अकरावीचे वर्ग ऑनलाइन वर्ग भरविण्यात येत होते. त्यासाठी राज्यातील जवळपास सव्वा लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी देखील केली. ऑनलाइन वर्गांसाठी ८० प्राध्यापकांचा गट एससीईआरटीतर्फे नेमण्यात आला. गटातील प्राध्यापक त्यांच्या महाविद्यालयातून अकरावीचे लेक्चर ऑनलाइनद्वारे लाईव्ह देतील आणि एससीईआरटीच्या यु-ट्यूब चॅनलवर हे ऑनलाइन लेक्चर उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु मोठ्या थाटात सुरू झालेले अकरावीचे ऑनलाइन वर्ग १० नोव्हेंबरनंतर अचानकपणे बंद झाले.  

त्यानंतर एससीईआरटीच्या यु-ट्यूब चॅनलवर देखील ऑनलाइन वर्गाचे काहीही 'नोटिफिकेशन' आले नाही. त्यामुळे अकरावीतील विद्यार्थ्यांची चिंता अधिक वाढल्याचे निदर्शनास येते. याबाबत एससीईआरटीच्या बाजू जाणून घेण्यासाठी उपसंचालक विकास गरड यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अकरावीच्या ऑनलाइन वर्गासाठी शिक्षण विभागाने दिलेल्या लिंकवर नोंदणी केली. त्यानंतर २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले, त्याबाबतचा मेसेज मोबाईवर आला होता. सुरुवातीला भाषा विषय शिकविण्यात आला. त्यानंतर हळूहळू अन्य विषय देखील शिकविण्यात येत होते. प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाले नसले, तरी अभ्यास सुरू झाल्याचे समाधान होते. परंतु आता अचानक ऑनलाइन वर्ग बंद झाले आहेत.-रिया गोरे, विद्यार्थिनी

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com