शरजिल उस्मानीवरवर देशद्रोहाचे कलम लावा; भाजप शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांकडे मागणी

शरजिल उस्मानीवरवर देशद्रोहाचे कलम लावा; भाजप शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे - एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर देशद्रोहाचे कलम लावून त्याला त्वरित अटक करावी. तसेच परिषदेच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवार्इ करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

उस्मानी यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत ॲड. प्रदीप गावडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार उस्मानीवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिषदेत केलेल्या भाषणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत उस्मानी आणि परिषदेच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवार्इ करण्याची मागणी केली. शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते.

Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ

हर्षाली पोतदार यांच्या निमंत्रणावर उस्मानी परिषदेत सहभागी झाला होता. ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या परिषदेच्या आयोजनातही पोतदार सक्रिय होती. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोतदार देखील आरोपी आहे. तर उस्मानीवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे, असे भाजपने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. 

पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शरजील उस्मानीसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने राज्यात येऊन हिंदूंचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारने तातडीने पावले उचलून उस्मानी आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येर्इल. 
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com