एल्गार प्रकरणी एनआयएच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे कलम नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए) मुंबईतील एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही.

पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए) मुंबईतील एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या एफआयआरमध्ये एकूण ११ जणांची नावं असून त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर दहशतवाद विरोधी कायदा (यूएपीए) आणि भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, एनआयएच्या नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचं कलमच लावण्यात आलेले नाही.

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

या प्रकरणातील काही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर सर्व आरोपींवर भादंवि कलमाच्या १२४ए (देशद्रोह) नुसार कलम वाढ करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास देखील केला आहे. मात्र  एनआयएच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Elgar case NIAs FIR does not contain The crime of treason

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: