एल्गारचा तपास "एनआयए'कडे वर्ग होणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

कायदेशीर व तांत्रीक बाबींमध्ये अडकलेल्या एल्गार परिषदेचा तपास वर्ग करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) लवकरच होण्याची शक्‍यता आहे. "एनआयए'ने याप्रकरणी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तेथील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एल्गारचा तपास वर्ग होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले. 

पुणे : कायदेशीर व तांत्रीक बाबींमध्ये अडकलेल्या एल्गार परिषदेचा तपास वर्ग करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) लवकरच होण्याची शक्‍यता आहे. "एनआयए'ने याप्रकरणी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तेथील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर एल्गारचा तपास वर्ग होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले. 

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या खटल्याच्या संदर्भातील कागदपत्रे मागविली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने एल्गारच्या तपासाची जबाबदारी तत्काळ "एनआयए'वर सोपविली होती. त्यानंतर "एनआयए'ने पुणे पोलिसांकडे तपास वर्ग करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र पोलिस महासंचालकांचा आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार होती. दरम्यान, "एनआयए'ने बुधवारी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. संबंधीत अर्जामध्ये "एनआयए'ने आम्ही 24 जानेवारी रोजी "एनआयए'च्या पोलिस अधीक्षकांकडे एल्गार प्रकरणी पुन्हा फिर्याद दाखल करुन त्याबाबत एनआयएच्या विशेष न्यायालयास कळविल्याचे नमूद केले होते. तसेच या खटल्याशी संबंधीत कागदपत्रे मुंबईच्या विशेष न्यायालयाकडे हलविण्याची मागणी केली होती. संबंधीत प्रकरण "एनआयए'कडे वर्ग होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सत्र न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेनंतरच पुढील प्रक्रिया होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar investigation may going to NIA