'आजचा हिंदू समाज सडलेला'; एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीचे वादग्रस्त वक्तव्य

टीम ई-सकाळ
Sunday, 31 January 2021

शर्जीलच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. टीव्ही चॅनेल्सनीही हा विषय उचलून धरला त्यामुळं भाजपनं याची दखल घेत कारवाईची मागणी केली.

पुणे Pune News : पुण्यात काल एल्गार परिषद झाली. या परिषदेतील एका वादग्रस्त वक्तव्यामुळं नवं वादळ उठलंय. 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे' या वक्तव्यामुळं भाजपनं जोरदार टीकेला सुरुवात केलीय. असं वक्तव्य करण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलाय.

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

एल्गार परिषदेतील  शर्जील उस्मानी या विद्यार्थी नेत्याचं भाषण वादग्रस्त ठरत आहे. काल झालेल्या परिषदेत त्यानं, 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे आणि भारतात मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे.' अशा आशयाचं वादग्रस्त वक्तव्य केलं. आज, शर्जीलच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. टीव्ही चॅनेल्सनीही हा विषय उचलून धरला त्यामुळं भाजपनं याची दखल घेत कारवाईची मागणी केली. भाजपने प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, 'हिंदूंना सडका म्हणण्याची हिंमत होतेच कशी?' शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी उपाध्ये यांनी केली आहे.

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

कोण आहे शर्जील उस्मानी?
शर्जील उस्मानी हा अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी असून, वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत असतो. दिल्लीत सीएए विरोधातील आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शर्जीलला अटक झाली होती. शर्जीलने त्यावेळी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यात बाबरी पुन्हा उभारू, असे लिहिले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली होती. त्याप्रकरणी त्याला जामीनही मिळाला. त्यानंतर शर्जीलने जेलमधील अनुभव सांगताना, 'जेलमध्ये माझी तुलना अजमल कसाबशी केली गेली,' असं सांगितलं होतं. एटीएसने आपला फोन जप्त केल्याचा खुलासाही त्यावेळी त्याने ट्विटरवरून केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elgar parishad 2021 sharjeel usmani controversial statement