पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली. ही परिषद येत्या शनिवारी ( ता.30) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.

पुणे Pune News: काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली. ही परिषद येत्या शनिवारी ( ता.30) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. 

निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता. त्यानंतर एल्गार परिषदेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात 30 जानेवारी रोजी परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. त्यामुळे फक्त 200 जणांना या परिषदेस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर 

दरम्यान, गेल्या महिन्यात 31 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला होता. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर परिषदेला परवानगी नाकारली होती. परिषदेचे संयोजक निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात वाद होऊन हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेमुळे हिंसाचार भडकला होता, असा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला होता.

#WakeUpUdaySamant सोशल मीडियावर होतेय ट्रेेंड; काय आहे प्रकरण?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elgar parishad get police permission 2021