सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर

देशात आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममतादीदी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मान-अपमान नाट्य घडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं मुंबईत अनावरण झालं. त्यावेळी शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर होते.  सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय. तर, ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयानंतरचा कॅप्टन अजिंक्य रहाणेचा ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संवादाने सगळ्यांचं वेधलं लक्ष; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार - सविस्तर वाचा

मोबाईल वापरातही मुलगा-मुलगी भेद; कुटुंबांची मानसिकता संतापजनक
डिजिटल जमान्यात आपण नवनवीन तंत्रज्ञान हाताळत आहोत. रोज बाजारात काही ना काही नवीन अपडेट येत आहेत. - सविस्तर वाचा

WHO ने पुन्हा केलं भारताचं कौतुक; मानले पंतप्रधान मोदींचे आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. टेड्रोस यांनी म्हटलं की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सतत साथ दिल्याबद्दल भारताचे आभार. - सविस्तर वाचा

लालूंची प्रकृती आणखी खालावली; पुढील उपचारासाठी दिल्लीला नेणार
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं रिम्समध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांनी दिल्लीला एम्समध्ये हलवण्याची तयारी करण्यात येत आहे. - सविस्तर वाचा

राजपथावर 'शिल्का' गन ऑपरेट करणार प्रिती; संधीबद्दल म्हणाली, महिला म्हणून नव्हे तर..
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भारतीय लष्कर आपली ताकद दाखवणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणावाचं वातावरण असताना जी शस्त्रे, टँक आणि क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली होती - सविस्तर वाचा

'तुम्हाला हे शोभत नाही'; PM मोदींच्या व्यासपीठावर जय श्रीराम ऐकताच ममतादीदी भडकल्या
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. - सविस्तर वाचा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची लाखमोलाची गोष्ट; एक लाखाच्या नोटेवर होता फोटो
तुम मुझे खून दो, मैं तुम्‍हें आजादी दूंगा....! जय हिंद! सारख्या घोषणांनी स्वातंत्र्याच्या लढाईला नवी ऊर्जा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. - सविस्तर वाचा

Fire at Serum Institute : एक हजार कोटींचे नुकसान : आदर पूनावाला
आगीत नव्या इमारतीच्या तीन-चार मजल्यांवरील साहित्य जळाल्याने सुमारे एक हजाराहून अधिक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. - सविस्तर वाचा

पडद्यामागच्या हिरोनंतर जिव्हाळ्याचा विषय झालेल्या अजिंक्यचा ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या मैदानात पहिला-वहिला विजय नोंदवत बॉर्डर गावसकर ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. या विजयानंतर रवि शास्त्रींनी ड्रेसिंग रुममध्ये संघातील खेळाडूंना भाषण दिले होते. - सविस्तर वाचा

"...तर विराटला सर्वच प्रकारातील नेतृत्व सोडावे लागेल"
विराट कोहली (Virat Kohli) जानेवारी 2017 मध्ये भारतीय संघाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करण्याची नामुष्की ओढावली. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com