अरे बापरे ! पात्र लाभार्थी निवासी सदनिकेपासून वंचित...

building.jpg
building.jpg

कोथरुड (पुणे) : एरंडवणा येथील स.नं. 44/1 मध्ये सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील निवासी सदनिकेसाठी पात्र असलेल्या 17 नागरिकांनी विकसकाकडून थकीत भाडे मिळत नसल्याची तक्रार करत विकसकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हरीकिसन झुंबरलाल राठी, नारायणदास राठी, प्रविण राठी, विनोद राठी यांनी केलेल्या अर्जात गेली 18 वर्षे निवासी सदनिका मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी एसआरए अधिका-यांना पत्र देवून न्याय मागितला आहे.

राठी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिका-यांना वेळोवेळी केलेल्या अर्जात बांधकाम व्यावसायिकाने रहिवाश्यांना निवासी सदनिका देण्याचे व त्यासंबंधी योग्य तो करारनामा करण्याचे, आजपर्यंत झालेले मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई विकसाकडून मिळावे अशी विनंती केली होती. त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी कुमार सिन्यु बिल्डर्सला कारणे दाखवा नोटीस देत गाळा देण्याविषयी सूचित केले होते. परंतु अजूनही राठी यांना निवासी गाळा मिळालेला नाही.
बांधकाम व्यावसायिकाने पात्र निवासी झोपडी धारकाला गाळ्याचे हस्तांतर करेपर्यत घरभाडे देणे आवश्यक होते. परंतु भाडे मिळाले नाही. यासंदर्भात नोटीस आल्यावर कुमार सिन्यु तर्फे डिसेंबर महिन्यात देण्यात आलेल्या उत्तरामध्ये सांगण्यात आले की, या योजनेला परदेशी फंड असल्याने 17 गाळेधारकांना भाडे देण्यास विलंब होत आहे. फंड आल्यानंतर भाडे देण्यात येईल.


कुमार बिल्डरचे प्रतिनिधी राजेश भोईटे म्हणाले की, दोन ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु फिनीशींग राहीले आहे. लॉकडाऊन मुळे कामगार नसल्याने काम थांबले आहे. कामपूर्ण झाले की गाळ्यांचे वाटप होईल. थकीत भाडे सुध्दा लवकरच देण्याची व्यवस्था करण्यात येईल. विनोद राठी म्हणाले की, एरंडवणा येथील ही सर्वात जुनी पुनर्वसन योजना आहे. तरीसुध्दा अजूनही काही गाळेधारक निवासी सदनिकेपासून वंचित राहतात हे अनाकलनीय आहे. सरकारने व संबंधित अधिका-यांनी यावर विचार करुन न्याय द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com