MLA Ravindra Dhangekar : कोथरूडला भयमुक्त करण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळा

कोथरूडमध्ये नुकत्याच घडलेल्या गोळीबार व खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे कोथरूड परिसर अशांत बनला आहे.
mla ravindra dhangekar
mla ravindra dhangekaresakal

पुणे - कोथरूडमध्ये नुकत्याच घडलेल्या गोळीबार व खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे कोथरूड परिसर अशांत बनला आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय वरदहस्त लाभलेल्या सर्व गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळून 'भयमुक्त कोथरूड' बनवावे,' अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

आमदार धंगेकर यांनी सोमवारी दुपारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धंगेकर म्हणाले, 'कोथरूडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा वावर वाढला आहे.

त्यांना राजकीय राजाश्रय मिळू लागला असून सत्ताधारी भाजप नेते सराईत गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षामध्ये प्रवेश देत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची. गुन्हेगारीला राजाश्रय मिळाल्याने तरुणांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढले आहे. काही मुले राजकारणाकडे वळण्यासाठी गुन्हेगारीत जात आहेत.'

'सत्ताधाऱ्यांकडून गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेऊन नंतर त्यांचाच वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावतात. पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून या भागातील वाढत्या गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा बसवावा. तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा

पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास करावा, या प्रकरणात दोषी ठरलेले तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करावी, अशीही मागणी धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com