Pune Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एनडीएतील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका कर्मचाऱ्याची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
Employee of NDA cheated of Rs 57 lakh pretext of giving good returns on investment in stock market
Employee of NDA cheated of Rs 57 lakh pretext of giving good returns on investment in stock market Sakal

Pune News : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका कर्मचाऱ्याची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत २८ वर्षीय कर्मचाऱ्याने (रा. खडकवासला) उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कर्मचाऱ्यास मोबाईलवर व्हॉटसॲप संदेश पाठवून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवली.

सायबर चोरट्यांनी पहिल्यांदा कर्मचाऱ्यास परताव्यापोटी अडीच लाख रुपये दिले. चोरट्यांनी कर्मचाऱ्याचा विश्वास संपादन करून आणखी रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या कर्मचाऱ्याने प्रलोभनास बळी पडून सायबर चोरट्यांच्या बॅंक खात्यात ५७ लाख २२ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. परंतु चोरट्यांनी परतावा दिला नाही. याबाबत कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com