esakal | बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली 12 लाखाची रोकड घेऊन कर्मचाऱ्याने ठोकली धूम
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली 12 लाखाची रोकड घेऊन कर्मचाऱ्याने ठोकली धूम

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे, : वीजबील भरणा केंद्रात जमा झालेली सव्वा बारा लाख रुपयांची रक्कम बॅंकेत जमा करण्याऐवजी केंद्राच्या कर्मचाऱ्याने रक्कम व दुचाकी घेऊन धूम ठोकली. हि घटना गुरूवारी सकाळी अकरा वाजता औंध परिसरात घडली. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावसाहेब शाहराम कराळे (वय.45, रा. बोपोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराव भैय्याराम अगरवाल (वय.60, रा. भैय्याराम निवास, नगर रोड) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगरवाल यांच्याकडे महावितरण विज बिल भरणा केंद्र चालविण्याचा अधिकृत डिलरशीप आहे. त्यांच्याकडे रावसाहेब कराळे हा कर्मचारी कामाला होता. त्याच्याकडे आकुर्डी येथील महावितरण वीज केंद्र येथे येथे दोन दिवसांमध्ये ग्राहकांची जमा झालेली सव्वा दोन लाखांची रक्कम व धनादेश आकुर्डी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करण्यासाठी विश्‍वासाने देण्यात आले होते. मात्र कराळे याने बॅंकेत पैसे न भरता पैसे व दुचाकी घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे फिर्यादी अगरवाल यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरसाठी ग्लोबल टेंडर काढणार - अजित पवार

loading image