इंटरनेट गंडल्याने 'वर्क फ्रॉम होम'मध्ये खोडा; नोकरदारांसोबत नागरिकही वैतागले!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

इंटरनेटला स्पीड नसल्याने ना सोशल मीडिया वापरता येत आहेत, ना वेब सीरिज पाहता येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या ऐंटरटेन्मेंटचे खोबरे झाले आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि बुधवारी (ता.३) आलेल्या वादळामुळे मोबाईल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. इंटरनेटचे स्पीड कमी होऊन सतत कॉल ड्रॉप होत असल्याने घरून काम करत असलेल्या अनेकांच्या कामात खोडा निर्माण झाला आहे. त्यात लाईटही नसल्याने नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.

- जगभरातून आणखी ३८ विमाने मुंबईत येणार; आतापर्यंत 'एवढ्या' नागरिकांना केले 'एअरलिफ्ट!'

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या अनेक खाजगी कार्यालयातील कर्मचारी घरूनच काम करत आहे. घरून काम करत असताना मोबाईल, कॉम्प्युटर आणि इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र लाईट नसल्याने फोन चार्ज करणे किंवा कॉम्प्युटर चालवणे अवघड झाले आहे. तर पावसामुळे पुरेशा क्षमतेने नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाइन काम करणे किंवा डेटा पाठवण्यात अनेक अडचणी येत आहेत. फोन रिस्टार्ट करून किंवा इंटरनेट चालू-बंद केल्याने इंटरनेटचे स्पीड वाढते. त्यामुळे कामात अडचणी निर्माण झाल्यास नोकरदार आणि नेटकरी सारखे फोन रिस्टार्ट करत असून त्यामुळे मोबाइलची बॅटरी देखील उतरत आहे.

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फिजिक्स विषयाचा नवीन अभ्यासक्रम कसा आहे? जाणून घ्या

"काल आणि आज फोनवरुन अजिबात संपर्क होत नाहीये. कॉल ड्रॉप होत असून इंटरनेट काम करत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी घरून काम करीत आहे. त्यात अशा अडचणीचा समाना करावा लागतो आहे. नेटवर्कसाठी फोन सारखा रेस्टार्ट करून काम सुरू आहे," असे गजानन सोनवणे यांनी सांगितले. 

तर योगेंद्र लडकत म्हणाले, "पाऊस व वाऱ्याचा मोबाईलच्या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर फोन लागतो. त्यात मधेच कॉल कट होतो. सर्वात जास्त प्रॉब्लेम नेटचा आहे. 4G फक्त नावाला आहे. 2G जीचे देखील स्पीट व्यवस्थितपणे मिळत नाही. त्यामुळे ऑफिसचे काम करण्यातही खूप अडचण येत आहे."

- ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन

ऐंटरटेन्मेंटला ब्रेक :   
लॉकडाउनमुळे शाळा-कॉलेज बंद असून उद्योग-व्यावसायही ठप्प झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि अनेक व्यावसायिक सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. तर अनेकांनी वेबसीरिज बघण्याचा धडाका लावला आहे. मात्र इंटरनेटला स्पीड नसल्याने ना सोशल मीडिया वापरता येत आहेत, ना वेब सीरिज पाहता येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या ऐंटरटेन्मेंटचे खोबरे झाले आहे.

या आहेत अडचणी 
- इंटरनेटला स्पीड नाही
- सतत कॉल ड्रॉप 
- लाईट नसल्याने चार्जिंग नाही
- डेटा पाठवायला किंवा डाउनलोडला लागतोय भरपूर वेळ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees who worked from home and citizens are annoyed by the lack of electricity and Internet