हक्काचा रोजगार देणाऱ्या शुभांगीताई गायकवाड

कुबेरा व्हेंचरच्या मॅनेजिंग डायरेक्‍टर शुभांगीताई गायकवाड इको फ्रेंडली पेन्सिलसह.
कुबेरा व्हेंचरच्या मॅनेजिंग डायरेक्‍टर शुभांगीताई गायकवाड इको फ्रेंडली पेन्सिलसह.

कुबेरा व्हेंचरच्या मॅनेजिंग डायरेक्‍टर शुभांगीताई गायकवाड यांनी महिलांना इको फ्रेंडली पेन्सिल बनविण्याचा व्यवसाय उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांना जगण्याचा आधार मिळाला आहे. 

खेड तालुक्‍यातील कुरुळीसारख्या छोट्याशा खेड्यात सासरी आलेल्या शुभांगीताई मंगेश गायकवाड यांनी इको फ्रेंडली पेन्सिल बनविण्याच्या व्यवसायात बाराशे महिलांना स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेऊन ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देणारी कुबेरा व्हेंचर नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली, त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम उपलब्ध करून दिले. 

माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करीन आणि पैसा म्हणतो तू काहीतरी केलं तरच मी येईन, हे अगदी खरं आहे. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या शुभांगी मंगेश गायकवाड या वडील विनायक फुगे यांना आदर्शस्थानी ठेवून आपल्या आयुष्याची गणिते सोडवत आल्या. त्या स्वतः उच्चशिक्षित असल्या, तरी त्यांना कोणाच्या हाताखाली काम करणे मान्य नव्हते. त्यांनी आपले पती मंगेश गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावत व्यवसायात असणारे खाचखळगे माहिती करून घेत व्यवसायात पदार्पण केले. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते; परंतु स्वतःच्या यशाचे श्रेय त्या पतीला द्यायला विसरत नाहीत. 

उद्योजक होण्याचे स्वप्न बघणाऱ्या या उद्योजिकेने स्वतःसोबत अनेक महिलावर्गाला स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. कुबेरा व्हेंचरच्या मॅनेजिंग डायरेक्‍टर म्हणून त्या काम पाहात आहेत. पर्यावरण पूरक वेलवेट पेन्सिल बनविण्याची मशिनविक्री, त्याचप्रमाणे कच्च्या मालाचा पुरवठा व तयार झालेल्या मालाच्या खरेदीची हमी स्वतः घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com