उर्से टोलनाक्‍यावर ‘एम्प्रेस’ यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

वाहनचालकाच्या सोईसाठी दोन्ही बाजूंना फास्टॅग विक्रेते सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय ऑनलाइन आणि बॅंकेतही फास्टॅग मिळतात. फास्टॅगसंबंधित मार्गदर्शन अथवा सूचना, तक्रारी, परतावा हवा असल्यास etc.support@sahkarglobal.com या मेलचा वापर करावा.
- रवींद्र टापरे, महाव्यवस्थापक, सहकार ग्लोबल

तळेगाव स्टेशन - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से येथील सहकार ग्लोबल संचलित टोलनाक्‍यावर मुळातच चार वर्षांपासून फास्टॅग ईटीसी यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित आहे. अद्याप सक्ती नसली तरी गेल्या महिनाभरापासून फास्टॅगधारक वाढल्याने साहजिकच नाक्‍यावरील कोंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुतगती महामार्गावरील उर्से येथील टोलनाक्‍यावर सतरा लेनपैकी मुंबईकडे दहा, तर पुण्याकडे सहा तसेच तळेगावकडे जाण्यासाठी एक लेन आहे. २०१४ पासून फास्टॅग यंत्रणा दोन लेन मुंबई आणि दोन लेन पुण्याकडे जाण्यासाठी कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. उर्वरित सर्वच लेनवर २०१६ पासूनच फास्टॅग यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत. सर्वच लेन ईटीसी हायब्रीड यंत्रणा संचलित आहेत. प्रत्येक लेनला ईटीसी फास्टॅग स्कॅनर आहेत. याबरोबरच ईटीसी रीडिंगसाठी आठ रीडरगन आहेत.

काश्‍मीरमधील सहा जणांना पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार

गेल्या पंधरा जानेवारीपासून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन, तर मंगळवारपासून (ता. ४) पुण्याकडे जाण्यासाठी दोन लेन फास्टॅग लेन म्हणून आरक्षित ठेवण्याची आल्या आहेत. या लेनवरील वाहने स्कॅन होऊन तीन सेकंदांत पुढे जातात. फास्टॅग ईटीसी लेनवरचे अगोदरचे प्रत्येकी तीन ऑपरेटर आणि तीन सुपरवायझर ऐवजी आता केवळ तीन सुपरवायझर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे आहेत. व्हीआयपी, रुग्णवाहिनीसाठी अद्याप विशेष पास उपलब्ध नसल्याने एक लेन राखीव ठेवण्यात आली आहे. टॅग मुबलकपणे उपलब्ध होऊन फास्टॅग सक्तीपर्यंत स्वतंत्र कॅश लेनची तात्पुरती सोय केली आहे. कॅश लेनमध्ये फास्टॅग विरहित वाहने रोख टोल भरून जाऊ शकतात. मात्र फास्टॅगसाठीच्या स्वतंत्र लेनमध्ये कुणी विना फास्टॅग अथवा बॅलन्स नसताना लेनमध्ये घुसल्यास दुप्पट आणि रोखीने टोल भरावा लागेल. यामागे वाहनधारकांना फास्टॅग वापराबाबत शिस्त लागणे हा उद्देश आहे. फास्टॅग बूथ मनुष्यबळ विरहित असल्याने कोणत्याही गाड्या ओळखपत्र अथवा स्थानिक पुरावा दाखवून जाऊ होऊ शकत नाही. द्रुतगती महामार्गावर फास्टॅग अंमलबजावणीमुळे कुणालाही सूट नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने फास्टॅग सक्तीने घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Empress system on Urse toll naka