काश्‍मीरमधील सहा जणांना पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

  • काश्‍मीरमधील सहा जणांना भाई-मर्दाना राष्ट्रीय पुरस्कार
  • पुण्यात वितरण : पुण्यात पहिल्यांदाच रबाब वादन

पुणे : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांचे सहकारी भाई-मर्दाना यांच्या नावाने यंदापासून राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार काश्‍मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील रबाब या प्राचीन वाद्याचे जतन करणारे सन्नाऊल्ला यांच्या कुटुंबातील अब्दुल हमीद भट व त्यांच्या अन्य पाच सहकाऱ्यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी (ता.7) पुण्यात या पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यानिमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच रबाब वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सरहद्दचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी गुरुवारी (ता.6) पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाशपर्व दिनानिमित्ताने पुण्यातील सरहद्द, शीख जनसेवा संघ आणि अहम फाउंडेशनच्यावतीने यंदापासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असल्याचेही नहार यांनी सांगितले. यावेळी शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा, चरणजित सहानी, अहम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया आदी उपस्थित होते. रोख 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पद्‌मश्री प्राणकिशोर कौल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कारविजेत्या अन्य पाच जणांत अब्दूल हमीद भट, अश्‍पाक हमीद भट, महंमद अल्ताफ भट, महंमद युसूफ शाह, सलीम जहागीर आणि यावर नजीर यांचा समावेश आहे.

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

नहार म्हणाले, "13 व्या काश्‍मीर महोत्सवाच्या निमित्ताने गुरू नानक देवजी यांना आयुष्यभर साथ देणारे सहकारी भाई आणि मर्दाना यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे. तसेच रबाब हे हळूहळू विस्मृतीत जाऊ लागलेले संगितवाद्य पुर्नजिवीत व्हावे, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पुरस्कार विजेते कुटुंब हे गेल्या 100 वर्षांपासून काश्‍मीरमध्ये रबाब या प्राचीन वाद्याचे जतन, संवर्धन आणि निर्मिती करत
आहे.''

हिंदू, मुस्लिम, शीख भाई-भाई- मोखा
रबाबवादक आणि गुरू नानक देवजी यांचे सहकारी भाई म्हणजे यांचे नाव बालाजी होते. ते हिंदू होते. दुसरे सहकारी मर्दानी हे मुस्लिम होते. त्यामुळे यातून हिंदू, मुस्लिम, शीख भाई-भाई असल्याचाच संदेश जात आहे. त्यामुळे सर्व धर्मियांनी एकत्र आले पाहिजे, असे मत संतसिंग मोखा यांनी यावेळी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six people from Kashmir National Award in Pune