पुणे : रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि काचांचा खच

खडकवासला धरणाचा किनारा बनलाय तळीरामांचा अड्डा;कडक कारवाईची गरज
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal

किरकटवाडी: खडकवासला धरणाचा किणारा काही उपद्रवी पर्यटक आणि तळीरामांचा अड्डा बनला असून रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि फुटलेल्या काचांचा खच किणाऱ्याच्या कडेने व पाण्यात पडलेला असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना या धारदार काचांमुळे गंभीर जखमा होत आहेत. त्यामुळे या बेजबाबदार पर्यटक व तळीरामांवर कडक कारवाई होणे गरजेचे बनले आहे.(pune news)

Khadakwasla Dam
माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

परवानगी नसताना पर्यटक सर्रासपणे खडकवासला धरणाच्या(Khadakwasla Dam) पाण्यात उतरताना दिसत आहेत. यातील अनेक उपद्रवी पर्यटक आणि तळीराम पाण्याच्या कडेला बसून मद्य प्राशन करतात व रिकाम्या बाटल्या तशाच पाण्यात किंवा कडेला फेकतात. फिरण्यासाठी आलेले इतर तरुण-तरुणी हुल्लडबाजी करत दगड मारुन या रिकाम्या बाटल्या फोडतात. फुटलेल्या बाटल्यांच्या या धारदार काचा पाण्यात दिसून येत नसल्याने धरणाचा किणारा अनेक ठिकाणी अत्यंत धोकादायक बनला आहे. तसेच पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याचे प्रदुषणही मोठ्याप्रमाणात होत आहे. पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनाने असे गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई व उपाययोजना करण्याची गरज आहे.

Khadakwasla Dam
‘रॅलींना घाबरू नका; कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी संसाधने’

"आपत्कालीन परिस्थितीत शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धरणाच्या पाण्यात उतरावे लागते.कडेने गाळ असल्याने पायात बूट घालून चालणे शक्य होत नाही. अनवाणी पायाने पाण्यात शिरल्याने जवानांच्या पायाला काचा कापल्याच्या घटना घडल्या आहेत." देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.

Khadakwasla Dam
चिंता करू नका, कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या आयुर्वेदात आहेत अनेक उपचार... वाचा

"खडकवासला धरणातील पाणी(Khadakwasla Dam) पिण्यासाठी वापरले जाते याचे फिरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाने भान ठेवणे आवश्यक आहे.शितपेयाच्या किंवा मद्याच्या बाटल्या पाण्यात फेकू नयेत.कोणीही पाण्यात उतरु नये. धरणाचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. " राजेंद्र राऊत, खडकवासला धरण शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.

"पाण्यात मगर असण्याची शक्यता असल्याने पर्यटकांना यापूर्वीही धरणात न उतरण्याचे आवाहन केलेले आहे. कोणीही जीव धोक्यात घालून पाण्यात उतरु नये. धरण परिसरात कोणी मद्य प्राशन करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.पाण्याच्या कडेला काचा फोडण्यासारखे विकृत कृत्य कोणीही करू नये." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com