सार्वजनिक वाहतूक सक्षम करा - जेनेट खान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच वाहतूक कोंडीवरील शाश्‍वत उपाय आहे, असे प्रतिपादन न्यूयॉर्कच्या माजी वाहतूक आयुक्त जेनेट सादिक खान यांनी केले. 

ब्लूम्बर्ग इनिशिएटिव्ह ऑफ ग्लोबल रोड सेफ्टी संस्थेअंतर्गत पुणे महापालिका व ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह तसेच परिसर संस्थेतर्फे ‘रिक्‍लेमिंग स्ट्रीटस ऑफ पुणे विथ द ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाइड’ या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा भाऊ साठे सभागृहात गुरुवारी केले होते. या वेळी खान बोलत होत्या. या वेळी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. 

जगातल्या कोणत्याही शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने रस्ते, उड्डाण पूल बांधणे हा उपाय असू शकत नाही, तर जनजागृती करून उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करणे व खासगी वाहनांचा वापर अत्यंत कमी असणे, हाच यावरील उपाय आहे. पुणे शहराच्या वाहतूक कोंडीसाठीही नागरिकांचा सहभाग व अशा कल्पक योजना राबविण्याची गरज असल्याचे मत खान यांनी व्यक्त केले.

न्यूयॉर्कमध्ये राबविलेले उपक्रम
    सायकलींसह सार्वजनिक वाहनांचा वापर
    सर्वसामान्यांमध्ये जनजागृती
    पादचाऱ्यांसाठी पुरेशी मोकळी जागा
    पार्किंगसाठी स्वतंत्र जागा
    विक्रेत्यांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र जागा

अपघात ४० टक्‍क्‍यांनी घटले
न्यूयॉर्कमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक कोंडीसाठी योजना राबविताना आम्ही नागरिकांपर्यंत पोचलो. त्या वेळी त्यांनी हसून आमची चेष्टा केली. मात्र, यावर सातत्याने काम करत राहिल्याने तेथील अपघातांचे प्रमाण ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाले. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमधील डॉक्‍टर उत्तम आरोग्यासाठी औषधांऐवजी चालणे, सायकलीचा व्यायाम आदी गोष्टीचा सल्ला देतात, असे खान यांनी सांगितले. 

Web Title: Enable public transportation Jenet Khan