लक्ष्मणने आेलांडली दिव्यांगत्वाची रेषा...

जितेंद्र मैड
Friday, 5 June 2020


दिव्यांगाचे दुचाकीचे स्वप्न साकार झाले.

कोथरुड (पुणे)  : मूळचा कोकणातील असलेला लक्ष्मण मारुती दळवी हा युवक दिव्यांग आहे. तो एका कॉलसेंटरमध्ये काम करतो. दिव्यांग असला तरी तो बास्केटबॉल, मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेत असतो. शहरात कुठे बॉडी शो असेल तर तेथे तो आवर्जून जातो. बास्केट बॉलच्या सरावासाठी त्याला खराडीवरुन कोरेगावपार्कला जावे लागते. परंतु, दिव्यांग असल्याने वेळेवर बस मिळणे, त्यात चढ उतार करणे अडचणीचे व्हायचे. त्याची ही अडचण मित्रांच्या लक्षात आली. तू दुचाकी का घेत नाही असे विचारल्यावर तेवढी ऐपत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मग त्याच्या मित्रांनी सांगितले की आम्ही डाऊन पेमेंट आणि साईड व्हीलचा खर्च करतो. नंतर तू दर महिन्याला बँकेच्या कर्जाचा हप्ता भर. महिन्याला अडीच हजाराचा हप्ता भरण्याची तयारी lत्याने दाखवली आणि त्याचे दुचाकीचे स्वप्न साकार झाले.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

ईनेब्लर चॅरीटेबल ट्रस्टचे अमोल शिनगारे म्हणाले की, गेली चार वर्षे शिवजयंती निमित्त आम्ही दिव्यांग बांधवांसाठी काही उपक्रम करत असतो. लॉकडाउनमुळे आम्ही हा उपक्रम पुढे ढकलला होता. लॉकडाउन शिथील झाल्याने आम्ही लक्ष्मण दळवी व गणेश बुरुडे या दोन होतकरु दिव्यांग युवकांना दुचाकीचे साईड व्हील आणि डाऊन पेमेंट अशी मदत केली आहे. यातील बोरुडे हे नगरमध्ये अडकले आहेत. लवकरच ते गाडीचा ताबा घेतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लक्ष्मणने दुचाकीचा ताबा घेतेवेळी अजय मोहोळ, किरण मोहोळ, अभिजीत शेंडगे, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, अल्पना वरपे, दुष्यंत मोहोळ, अमित राठी, गणेश मोहोळ, रमाकांत साळुंखे, प्रशांत बलकवडे, कैलास माझीरे उपस्थित होते. सर्वांनी त्याला शुभेच्छा देताना अधिक यश मिळव असे आवर्जून सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enabler Charitable Trust help to handicap person in kothrud