ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा; कुलगुरूंनी प्राचार्यांना केले आवाहन

Students_Online_Exam
Students_Online_Exam

पुणे : ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा पार पाडायची असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शुक्रवारी (ता.11) संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी ग्रामीण भागातील प्राचार्यांनी ऑनलाइन परीक्षेबाबत तक्रारींचा पाढा वाचला.

त्यावर विद्यापीठाकडून अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालयांना सहकार्य केले जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले.

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा 'मल्टिपल च्वाईस कोश्‍चन' (एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा होणार आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी, अशी विद्यापीठाची भूमिका आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्राचार्यांनी ऑनलाइन परीक्षा घेताना ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण आहे, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल, टॅब, लॅपटॉप उपलब्ध नाही. चंद्रपूर, नागपूर यासह राज्याच्या ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाइन परीक्षा शक्‍य झाली नाही तर कशा पद्धतीने परीक्षा घ्यावी असे यासह इतर प्रश्‍न उपस्थित केले. त्याबाबत कुलगुरूंनी शंकांचे निरसन केले. तसेच 13 सप्टेंबर पर्यंत परीक्षा ऑनलाइन देणार की ऑफलाईन हा पर्याय ऑनलाइन विद्यार्थ्यांना निवडायचा आहे. त्यावेळी
विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच पर्याय निवडावा यासाठी त्यांच्यात जनजागृती करावी. एमसीक्‍यू परीक्षेपूर्वी त्यांना सराव परीक्षा करण्यासाठी संधी दिली जाईल असेही सांगण्यात आले.

अंध विद्यार्थ्यांना समस्या
अनेक महाविद्यालयांमध्ये अंध विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार असून, त्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्‍य होणार नाही, अशी अडचण काही प्राचार्यांनी मांडली. या विद्यार्थ्यांसाठी स्पीक टू टेक्‍स्टच सुविधा सॉफ्टवेअरवर दिल्यास ते परीक्षा देऊ शकतील. त्याबाबतही विचार केला जाईल असे सांगण्यात आले आहे.

''अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्राचार्यांची बैठक घेतली. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. ज्या काही तांत्रिक अडचणी किंवा शंका असतील तर त्या विद्यापीठ सोडविण्यासाठी मदत करेल असा विश्‍वास प्राचार्यांना देण्यात आला आहे.''
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com