esakal | ऑक्‍सिजन टॅंकरलाही अॅम्बुलन्ससारखा सायरन बसवा; उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी.

ऑक्‍सिजन टॅंकरलाही अॅम्बुलन्ससारखा सायरन बसवा; उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑक्‍सिजन टॅंकरच्या वाहतुकीतील वेळ वाचविण्यासोबतच रुग्णालयात जलदगतीने ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा, यासाठी ऑक्‍सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेप्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच, पोलिसांनी ऑक्‍सिजन टॅंकर वाहतूक कोंडीत न अडकता मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्‍तांसह अन्य अधिकाऱ्यांना दिल्या. 

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

येथील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

तुम्ही लठ्ठ आहात? तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक!​

पवार म्हणाले, राज्यभरातून कोरोना बाधित रुग्ण पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी सरकारी यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. परिस्थती नियंत्रणासाठी राज्य सरकार सर्व मदत करीत आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागानेही सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी.

विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये. तसेच, कामात गतिमानता येण्यासाठी विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे. विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्‍सिजनअभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

loading image