esakal | तुम्ही लठ्ठ आहात? तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक!
sakal

बोलून बातमी शोधा

Obesity

स्थूलतेचा परिणाम ओटीपोटाची चरबी छातीच्या पोकळीत ढकलली जाते. पर्यायाने फुप्फुसांवर ताण येतो आणि नलिकेतील वायू प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

तुम्ही लठ्ठ आहात? तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शारीरिक स्थूलता किंवा लठ्ठपणामुळे व्यक्तीला एकापेक्षा अधिक जीवनशैलीशी निगडित आजार असतात. तसेच तिला श्‍वसनालाही त्रास होतो. पर्यायाने अशांना कोरोनाचा धोका अधिक वाढतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास अत्यवस्थ रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिका, युरोप, ब्राझील येथील संशोधनानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) शास्त्रज्ञांनी भारतातही हा धोका अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थूलता किंवा लठ्ठपणा असलेल्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच त्यांना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे डॉ. राखी यादव, डॉ. संदीप अगरवाल आणि डॉ. अर्चना सिंह यांनी शोधनिबंधात म्हटले आहे.

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरुच; पोलिसांनी ८ दिवसांत...​

स्थूलतेचा परिणाम ओटीपोटाची चरबी छातीच्या पोकळीत ढकलली जाते. पर्यायाने फुप्फुसांवर ताण येतो आणि नलिकेतील वायू प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच ऑक्‍सिजनेशनसाठी येणाऱ्या रक्ताचे प्रमाणही वाढते. स्थूलतेमुळे व्यक्तीतील रोगप्रतिकारशक्तीही कमी होते. चरबीमुळे विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झालेला असतो. पर्यायाने त्यांच्यामध्ये जीवनशैली विकारांचे (उच्च रक्तदाब, मधुमेह आदी) प्रमाणही अधिक असते. कोरोनाच्या उपचारावेळी अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना क्‍लिष्टता वाढत जाते.

डिजिटल बॅंकिंग वापरणाऱ्यांचा टक्का वाढला; कोरोनामुळे झाली मोठी वाढ​

उपाययोजना : 
- स्थूल रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था हवी. 
- त्यांच्यासाठी अतिरिक्त ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर हवे. 
- अशा लोकांनी आहाराबरोबरच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. 
- लक्षणे जाणवल्यास त्वरित चाचणी आणि डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 

रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित (स्रोत : 'हॅमर' नियतकालिक, इंग्लंड)

बॉडी मास इंडेक्‍स (शरीर वस्तुमान दर्शक) : दाखल रुग्ण (टक्के) साधारण (बीएमआय : 18.5 ते 25 प्रती वर्गमिटर) : 14
स्थूल (बीएमआय : 25 ते 29) : 19
लठ्ठपणा (बीएमआय : 30 ते 34) : 24
अति लठ्ठपणा (बीएमआय : 35 पेक्षा जास्त) : 43

भारतातील नागरिकांचे प्रमाण (स्रोत : आयसीएमआर 2015) स्थूल : 11.8 ते 31.3 टक्के

लठ्ठ : 16.9 ते 36.3 टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)